स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

भारताचा 69 वा स्वातंत्र्य सोहळा - Dr. Tejas Lokhande

आज स्वातंत्र्य भारताचा 69 वा सोहळा. स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतात विविध रंग बहरले. प्रत्येक क्षेत्रात भारताने आपलं स्वतंत्र स्थान निर्माण तर केलंच पण दिवसेंदिवस कले कले ने ही चंद्रकोर तेजस्वी चंद्राप्रमाणेच सार्‍या ब्रम्हांडात दैदीप्यमान होऊ लागली. अशा भारत भूमीत जन्म झाला याहून अधिक पुण्याई काय सांगावी. येत्या वर्षांत आपण हि खारी चा वाटा पेलून या भारतदेशाला अग्रगण्य स्थान प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विज्ञान, वैद्यकीय, अभियंत्रकी, संगणक, जागतिक पातळीवरील क्रिडा, साहित्य, दृश्यकला, पर्यटन विकास,  आरोग्यसेवा,  कला अशा अनेक गोष्टींवर भारताने विजय मिळविला आहे. आत्ता 'अच्छे दिन' पाहणे हा आपला हक्कच नव्हे तर आपल जबाबदारी अन कर्तव्य आहे. चला या आजच्या दिनी प्रण करूया की असे अनेक सोहळे आपण याची देही याची डोळा पहायला मिळावे.
जय हिंद....
जय भारत....
डाॅ. तेजस लोखंडे
9773267001
🙏

निसर्ग भ्रमण, रोमांच आणि अध्यात्म ह्यांचा त्रिवेणी संगम - सज्जनगड, ठोसेघर धबधबा आणि पटेश्वर मंदिर - Special trekk for age group 10 years to 65 years..

प्रत्येक व्यक्तीची मनाने तरुण किंवा तनाने तरुण या दोनच वृत्तीत विभागणी होते. खरं तर तरूणाईत तरंगणारं मन मरणाचा कधी विचारच करत नाही. तनाची शक्ती कमी झाली तरी आनंदाची आसक्ती कमी होत नाही. खूप काही अनुभवण्याची इच्छा  असते तरी आधाराविना धीर होत नाही. मग उंडारणारं मन आठवणींशी पाठशिवणीचा खेळ खेळू लागतं.
पावसाळा आला धरती न्हाऊन निघाली की तिचा सुस्नात मृदगंध ऊरात भरुन घ्यावासा वाटतो. वाटतं वर्ष सरसरत निघून गेली. सरीवर सरी बरसल्या पण कुटुंबासाठी झिजतांना भिजायचं मात्र राहूनच गेलं.
आठवतो तो जुना पाऊस ?
चिंब भिजवणारा, चिखलात लडबडवणारा ?
वाहत्या पाण्यात  होड्या  सोडत एकमेकांच्या खोड्या काढणारा? भर पावसात आकाशाकडे तोंड करुन " ये रे ये रे पावसा " म्हणत ते स्वर्गीय जलबिंदू चातका सारखे चाखणारा ?
तो पाऊस, ज्याने मनाला अंकुर फुटायचे ,आनंदाला पालवी फुटायची. वनातल्या रानफुलांगत  मन कसं फुलारुन जायचं. तो टप्प टप्प आवाज  हल्ली गप्प गप्प  झालाय.
आणता येतील ते क्षण पुन्हा?  
"आनंदयात्री मी आनंदयात्री " म्हणत मनमोराचा पिसारा फुलेल  पुन्हा ?
एकच दिवस तो अनुभव पुन्हा  घ्यायचाच, तरुणांच्या सोबतीनं  तरुण होत कानात वारं शिरलेल्या वासरागत रानोमाळ  हुंदडायचंय !
     स्वास्थ्य जपणं आणि रंगात रंगणं हेच तर स्वास्थ्यरंगाचं ब्रीद !
     आपल्या  मनातले भाव नेमके हेरून सह्याद्रीच्या कुशीत पहुडलेल्या  आणि समर्थाच्या सान्निध्याने पुनीत झालेल्या साताऱ्यातील
1. " सज्जनगडाची " गडभेट....
2. ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील उंच धबधब्यांपैकी  दुसर्‍या क्रमांकावर असलेला धबधबा.
3. पटेश्वर मंदिर - 16 व्या शतकातील दगडी बांधकामातले मंदिर जिथे दहा हजारांहून अधिक शिवलिंगांची अंगठ्याच्या आकाराच्या दगडात कोरलेल्या प्रतिकृती आढळते.
दिनांक - 23 ऑगस्ट 2015 ,रविवार
वयोगट - 10 वय वर्ष ते 65 वय वर्ष
निसर्ग भ्रमण, रोमांच आणि अध्यात्म ह्यांचा त्रिवेणी संगम
घडवण्याचा संकल्प सोडत आहोत. आपण सामील व्हाल याची खात्री  आहे.
बघू आपल्यातली तरुणाई किती हिरवी,किती गहरी आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणी करिता
संपर्क -
॥ स्वास्थ्यरंग ॥ गडभेट
डॉ. तेजस लोखंडे -  9773267001
श्री. महेंद्र बेरगळ - 9004867387

Blog link - http://swasthyarang.blogspot.in
Pls like our page - https://m.facebook.com/swasthyarang

आस .... by Tejas Zore

||  आस  ||

चातक झालो आता ,
तुझी वाट पाहून राया...
तुझ्याइना धान माझं ,
गेलं की रं वाया....

नको तिथं माॅप हाईस ,
माह्या शिवारी उलटी काया...
नको थबकू ये झरारा
घरदार जायील वाया...

कोरड पडली इथं ,
जीव माझा टांगणीला ...
इथं तुझी पाठ हाय ,
तिथं पाणी जातं वाया ...

कुठे हाटेलाला देतोस ,
माया पिकाला भी दे पियाला ...
येऊन जा की रं एकदा ,
लय उपकार होतील माया ...

                -तेजस ग. झोरे.
               ॥ स्वास्थ्यरंग ॥
                9664077146

एक निखळ मैत्री - मोहन इधाटे.

एक निखळ मैत्री.
स्वास्थ्यरंग परिवारामार्फ़त झालेली,
रंग वेगवेगळे असले तरी एकाच रंगात रंगणारी..

एक निखळ मैत्री.
चर्चा करता करता भांडणारी,
एका बाजूने "सोड" म्हंटल्यावर,
दुस~या बाजूने सोडणारी,

एक निखळ मैत्री.
अल्लडपणे रुसवणारी
अन् तोच रुसवा घालवण्यासाठी
प्रेमाने दोन घास भरवणारी..

एक निखळ मैत्री.
सहवासात आनंद देणारी,
अन् एकमेकांना निरोप देतांना
घट्ट घट्ट मीठी मारणारी.

एक निखळ मैत्री.
अखंड दिवा तेवत ठेवणारी
आणि आयुष्यभराची साथ मिळेल हा विश्वास दाखवणारी..

स्वास्थ्यरंगाबरोबर झालेल्या  मैत्रीला कोणाची नजर न लागो..
हीच चिंतामणी चरणी प्रार्थना..🙏

- (मोहन इधाटे)

मैत्री

मैत्री  एक नातं...
...
न शोधता गवसलेलं
बोध न घेता बोकाळलेलं
न सांगता उमजणारं...
फुलागत उमलणारं...
वासरागत उंडारणारं..
क्षणात रुसणारं ..
क्षणात हसणारं.....
कधी अव्वल... कधी अवली...
कधी ऊन... कधी सावली...
कधी सुगंध... कधी दंग...
कधी धिंगाणा... कधी तराणा
लाभले ऐसे विविध रंगा... मित्र बहुरूपी...
नजर ना लागो या अत्तराच्या कुपी....

मैत्री दिन नुसता एक दिवसाचा नसतो... मैत्री एक सत्र आहे..अहोरात्र   तेवणारं अग्निहोत्र आहे  साजरा करायला दिनाची नव्हे तर जुळणार्‍या मनाची गरज असते....

तुमच्या ही आयुष्यात असाच मनाने जुळलेला मित्र परिवार लाभो हीच चिंतामणी चरणी प्रार्थना.

- तेजस लोखंडे कृत... शाम नाबर संस्कृत.. मैत्रीचा निखळ आनंद शब्दातून