प्रत्येक व्यक्तीची मनाने तरुण किंवा तनाने तरुण या दोनच वृत्तीत विभागणी होते. खरं तर तरूणाईत तरंगणारं मन मरणाचा कधी विचारच करत नाही. तनाची शक्ती कमी झाली तरी आनंदाची आसक्ती कमी होत नाही. खूप काही अनुभवण्याची इच्छा असते तरी आधाराविना धीर होत नाही. मग उंडारणारं मन आठवणींशी पाठशिवणीचा खेळ खेळू लागतं.
पावसाळा आला धरती न्हाऊन निघाली की तिचा सुस्नात मृदगंध ऊरात भरुन घ्यावासा वाटतो. वाटतं वर्ष सरसरत निघून गेली. सरीवर सरी बरसल्या पण कुटुंबासाठी झिजतांना भिजायचं मात्र राहूनच गेलं.
आठवतो तो जुना पाऊस ?
चिंब भिजवणारा, चिखलात लडबडवणारा ?
वाहत्या पाण्यात होड्या सोडत एकमेकांच्या खोड्या काढणारा? भर पावसात आकाशाकडे तोंड करुन " ये रे ये रे पावसा " म्हणत ते स्वर्गीय जलबिंदू चातका सारखे चाखणारा ?
चिंब भिजवणारा, चिखलात लडबडवणारा ?
वाहत्या पाण्यात होड्या सोडत एकमेकांच्या खोड्या काढणारा? भर पावसात आकाशाकडे तोंड करुन " ये रे ये रे पावसा " म्हणत ते स्वर्गीय जलबिंदू चातका सारखे चाखणारा ?
तो पाऊस, ज्याने मनाला अंकुर फुटायचे ,आनंदाला पालवी फुटायची. वनातल्या रानफुलांगत मन कसं फुलारुन जायचं. तो टप्प टप्प आवाज हल्ली गप्प गप्प झालाय.
आणता येतील ते क्षण पुन्हा?
"आनंदयात्री मी आनंदयात्री " म्हणत मनमोराचा पिसारा फुलेल पुन्हा ?
एकच दिवस तो अनुभव पुन्हा घ्यायचाच, तरुणांच्या सोबतीनं तरुण होत कानात वारं शिरलेल्या वासरागत रानोमाळ हुंदडायचंय !
एकच दिवस तो अनुभव पुन्हा घ्यायचाच, तरुणांच्या सोबतीनं तरुण होत कानात वारं शिरलेल्या वासरागत रानोमाळ हुंदडायचंय !
स्वास्थ्य जपणं आणि रंगात रंगणं हेच तर स्वास्थ्यरंगाचं ब्रीद !
आपल्या मनातले भाव नेमके हेरून सह्याद्रीच्या कुशीत पहुडलेल्या आणि समर्थाच्या सान्निध्याने पुनीत झालेल्या साताऱ्यातील
1. " सज्जनगडाची " गडभेट....
आपल्या मनातले भाव नेमके हेरून सह्याद्रीच्या कुशीत पहुडलेल्या आणि समर्थाच्या सान्निध्याने पुनीत झालेल्या साताऱ्यातील
1. " सज्जनगडाची " गडभेट....
2. ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील उंच धबधब्यांपैकी दुसर्या क्रमांकावर असलेला धबधबा.
3. पटेश्वर मंदिर - 16 व्या शतकातील दगडी बांधकामातले मंदिर जिथे दहा हजारांहून अधिक शिवलिंगांची अंगठ्याच्या आकाराच्या दगडात कोरलेल्या प्रतिकृती आढळते.
दिनांक - 23 ऑगस्ट 2015 ,रविवार
वयोगट - 10 वय वर्ष ते 65 वय वर्ष
निसर्ग भ्रमण, रोमांच आणि अध्यात्म ह्यांचा त्रिवेणी संगम
घडवण्याचा संकल्प सोडत आहोत. आपण सामील व्हाल याची खात्री आहे.
घडवण्याचा संकल्प सोडत आहोत. आपण सामील व्हाल याची खात्री आहे.
बघू आपल्यातली तरुणाई किती हिरवी,किती गहरी आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणी करिता
संपर्क -
॥ स्वास्थ्यरंग ॥ गडभेट
डॉ. तेजस लोखंडे - 9773267001
श्री. महेंद्र बेरगळ - 9004867387
संपर्क -
॥ स्वास्थ्यरंग ॥ गडभेट
डॉ. तेजस लोखंडे - 9773267001
श्री. महेंद्र बेरगळ - 9004867387
Blog link - http://swasthyarang.blogspot.in
Pls like our page - https://m.facebook.com/swasthyarang
वा सूंदर
उत्तर द्याहटवातुमची भ्रमन्ती ,लेख आणि फोटोज मोहक आहेत.सज्जन गड एकड़ सर करायची इच्छा निर्माण झाली आहे.