मैत्री एक नातं...
...
न शोधता गवसलेलं
बोध न घेता बोकाळलेलं
न सांगता उमजणारं...
फुलागत उमलणारं...
वासरागत उंडारणारं..
क्षणात रुसणारं ..
क्षणात हसणारं.....
कधी अव्वल... कधी अवली...
कधी ऊन... कधी सावली...
कधी सुगंध... कधी दंग...
कधी धिंगाणा... कधी तराणा
लाभले ऐसे विविध रंगा... मित्र बहुरूपी...
नजर ना लागो या अत्तराच्या कुपी....
मैत्री दिन नुसता एक दिवसाचा नसतो... मैत्री एक सत्र आहे..अहोरात्र तेवणारं अग्निहोत्र आहे साजरा करायला दिनाची नव्हे तर जुळणार्या मनाची गरज असते....
तुमच्या ही आयुष्यात असाच मनाने जुळलेला मित्र परिवार लाभो हीच चिंतामणी चरणी प्रार्थना.
- तेजस लोखंडे कृत... शाम नाबर संस्कृत.. मैत्रीचा निखळ आनंद शब्दातून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा