स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

Sanskarbharti Rangoli Workshop and Diya painting Workshop

पूर्वीची चाळीतली दिवाळीची मजा आता आठवणीत जमा होऊ लागली आहे. सकाळी आईने न उठवता उठायचं, तेल उटण्यानं न्हाऊ माखून  घ्यायचं. कार्ट्यांनी कारीट फोडलं का गं...? असा बाबांचा आवाज  आला की गोविंदा म्हणत कारीट फोडायचं...  त्यात बोट बुडवायचं आणि जिभेला लावताना दुसरंच बोट लावायचं. जिभेची चव न बिघडवण्याची सवय त्याच काळात लागली. छान छान कपडे घालायचे, वर्षातून एकदाच मनगटाला अत्तर लागलं की मन कसं भरुन यायचं. कंदिलाच्या शेपट्या, करंज्या इ. उरलेली कामं उरकायची.
फटाक्यांच्या पेटीवर पुन्हा एकदा  नजर फिरवायची. ऐटीत पाटावर बसायचं. आई डोळ्यांच्या आणि तूपवातीच्या निरांजनाने ओवाळायची, औक्षण करत ईडापिडा टळो म्हणत आपल्या  कपाळावर बोटं मोडायची. आईच्या भाजणीच्या चकल्या, शेव, शंकरपाळी, लाडू, चिवडा, अनारसे, करंज्या, चिवडा, चिरोटे मनमुराद खायचे आणि चाळीतल्या प्रत्येक घराबाहेर काढलेल्या रांगोळ्या  निरखत हरखून जायचे.
हां हां म्हणता दिवाळी यायची आणि फटाक्यांची माळ फुटावी तशी पटकन निघून जायची.
उरायचा फक्त  दिवाळीचा अभ्यास  आणि पुढच्या दिवाळीचा ध्यास. आता विचारावसं वाटतं....
 
   अरे कुठे नेऊन ठेवलीत ती  दिवाळी माझी.

धनानं मनावर एवढं गारुड केलंय की रुढी पार गाडून गेल्या आहेत. पूर्वी  दिवाळी  कलाकुसरीची होती
आता कामचुकारीची होतेय.
ज्योतीने तेजाची आरती करणारी आपली संस्कृती का विझत चाललीय. आपली कला कोमात गेल्यासारखी का निपचित पडलीय.

अस्वस्थ वाटतंय. शरीरस्वास्थही बिघडतय त्यामुळे  !

माझा छंद माझा ढंग माझा रंग
हवाय मला..
ही भावना आजकाल प्रत्येकाची !
म्हणूनच स्वास्थ्यरंगाच्या माध्यमातून आम्ही एक अनोखं शिबीर आयोजित करीत आहोत.

" संस्कारभारती रांगोळी व                
                      दिवे-पणत्या सजावट शिबिर "

🎯 संस्कारभारती रांगोळी -
1. रांगोळी - इतिहास आणि परिचय
2. रांगोळी - मुळ चिन्हे, विविध आकार
3. रांगोळी चे आकार-रंग-पारंपारिक दृष्ट्या नियोजन
4. दिवाळी विशेष रांगोळी - दारा समोर रेखाटण्याकरिता सोप्या पण धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन व भाऊबीज निमित्ताच्या विशेष रांगोळी
5. रांगोळी चे प्रात्यक्षिक.
6. दिवाळी विशेष महारांगोळी

🔥दिवे-पणत्या सजावट -
1. दिवे-पणत्यांचे प्रकार आणि वैशिष्ट्य
2. दिव्यांचा सजावटीत उपयोग
3. दिव्यांची रंग सजावट - प्रकार वैशिष्ट्य आणि प्रात्यक्षिक.
4. सजावटीत उपयोगात येणार्‍या गोष्टींचं मार्गदर्शन.

🔑शिबिरात महत्वाचे -
'आरोग्यदायी दिवाळी' - एक आरोग्यपूर्ण उहापोह असलेला लेख,
माहितीपत्रक आणि रांगोळी सरावास उपयोगी तालिका.

👜पुरविण्यात येणारी सामग्री-
1. रांगोळी साहित्य, रंग व चाळण. 2. दिवे-पणत्या सजावटीत लागणारे रंग आणि रंगवण्याकरिता लागणारा खास 9 पणत्यांचा, शुद्ध मातीचा दीपथाल.
3. चहा आणि अल्पोपहार.

📝शिबीरार्थींनी आणावयाचे साहित्य -
1. कलर ब्रशेस - साईज 1,2,3,5,7,8
2. हातरूमाल / नॅपकिन
3. दुपार करिता जेवणाचा डब्बा
4. मुलींनी ओढणी आणणे आवश्यक आहे.
5. पांढरी रांगोळी घेण्याकरिता मध्यम आकाराचा प्लास्टिक चं भांडे / बाऊल.

📆शिबिर दिनांक - 1 नोव्हेंबर 2015, रविवार

⏰वेळ - सकाळी 10 ते सायं 6 पर्यंत
( सकाळी 9:30 पर्यंत नोंदणी करिता येणे आवश्यक आहे.)

🏡स्थळ - गुरू नानक काॅलेज, जी. टी. बी. नगर, सायन, मुंबई -

🔴नाव नोंदणी करिता फोन संपर्क करणे. विना नाव नोंदणी शिबिरात प्रवेश देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

📞अधिक माहितीसाठी संपर्क -
डाॅ. तेजस लोखंडे - 9773267001
श्री. श्याम मटकर - 9619053327

Pls like our page - https://m.facebook.com/swasthyarang

Visit our blog -
https://swasthyarang.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा