स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

मानला तर देव नाहीतर दगड

प्रकटली आईभवानी...

संकल्पपूर्तीचं एक वर्ष सरलं....

प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की आपली सेवा केवळ आराध्य देवतेच्या चरणी अर्पण करावी. गेली अनेक वर्षे रंगावलीच्या रुपात मी माझी कला सेवा रूपात श्री चरणी अर्पण केली.

माझ्यासारख्या सामान्य व्यक्ति ची भक्ति आदिशक्ती पर्यंत पोहोचते का ?   
मानला तर देव, नाहीतर दगड....

दरवर्षी काढलेल्या रांगोळ्यांवर पावलांचे ठसे दिसतात पण या सगळ्यात ह्या पाऊलखुणांची खुण निराळी भासली. लहान पावलांनी तिच्या रूपात कुणी यावं.....
भर रांगोळीवर चालावं.....
मळवट सांभाळून चरणांचे ठसे उमटावे.....
अन आल्या पावलांनी सबंध रांगोळीवर चालून निघून जावं.....

डोळ्यांना हा जरी चमत्कार वाटला तरी एका कलाकाराला हा आईने सेवेचा दिलेला प्रसादच आहे...
आईभवानी ने माझी सेवा कबूल केली ह्यातली धन्यता शब्दात मांडणे कठीण आहे...

आईभवानी चा उदो उदो. ..
चिंचपोकळी च्या आईभवानी चा विजय असो. ....

डाॅ. तेजस लोखंडे
9773267001

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा