आरोग्य आणि रंग, रंग आणि सूर यांची सांगड घालत "स्वास्थ्य रंग‘चे डॉ. तेजस लोखंडे म्युझिकल रांगोळीचा अविष्कार साकारतात. वाद्यसूर आणि रंगाची जुगलबंदी या म्युझिकल रांगोळीमधून लोकांसमोर येणार आहे. गिरगाव, लालबाग, मुलुंड इथे शोभायात्रांमधून लोखंडे म्युझिकल रांगोळीचा प्रयोग सादर करणार आहेत. कलेच्या या जुगलबंदीबद्दल त्यांच्याशी संवाद...
स्वास्थ्य रांगोळी ही संकल्पना नेमकी काय आहे?
मी स्वतः वैद्यकीय व्यवसायात आहे. रुग्णावर उपचार करताना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचा विचारही केला पाहिजे. तो करताना त्याच्याशी कलेची सांगड घालावी असं मला वाटलं. मी मग रुग्णांना चित्र काढा, रांगोळी काढा, लिहा आणि अभिव्यक्त व्हा,
असं सांगायला लागलो आणि त्याचे चांगले परिणाम मिळत गेले. त्याचा पुढचा टप्पा हा म्युझिकल रांगोळीचा होता. रांगोळीमधून सामाजिक संदेश दिला जातोच; पण नृत्य आणि संगीत अशी जुगलबंदी होऊ शकते तर रांगोळी आणि संगीत अशी का होऊ शकत नाही? याचा विचार केला. रांगोळी काढताना आम्हाला प्रसन्न वातावरण लागतं. त्या वेळी आम्ही गाणी ऐकायचो. काही वेळा त्या ठेक्यावर स्ट्रोक पडू लागले. त्या गाण्यानुसार रंगांची उधळण होऊ लागली आणि त्यातूनच पुढे ही संस्कारभारतीचं मॉडर्नाईझ रूप आम्ही पुढे आणलं.मी स्वतः वैद्यकीय व्यवसायात आहे. रुग्णावर उपचार करताना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचा विचारही केला पाहिजे. तो करताना त्याच्याशी कलेची सांगड घालावी असं मला वाटलं. मी मग रुग्णांना चित्र काढा, रांगोळी काढा, लिहा आणि अभिव्यक्त व्हा,
ही रांगोळी नेमकी कशी साकारली जाते?
प्रत्येक गीतामध्ये सूर, ताल, लय, शब्द असतात. रांगोळी साकारताना त्या तालावर तुमचे हात थिरकतात, तसे स्ट्रोक्स पडतात. त्या शब्दांमधून भाव प्रकट होतात आणि तशी रांगोळी साकारली जाते. नादानुसार रंगाची उधळण होते. दुर्गे दुर्घट भारी म्हणताना रांगोळीमध्ये दुर्गा अवतरली पाहिजे. ती बघणाऱ्याला रिलेट झाली पाहिजे.

अशी रांगोळी काढताना रसिकांची कशी दाद मिळते?
ठाण्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने 35 फूट बाय 35 फूट रांगोळी काढली होती. शंकराने असुरांचा वध केला, त्रिपुरांतक हे नाव पडलं. त्या वेळी रांगोळीतून ओम साकारून शंकराची बारा रूपं, बारा जोतिर्लिंगांची नावे त्या रांगोळीमध्ये काढली होती. मराठी दिनानिमित्त पूर्वी मोडीतून व्यवहार होत होते, त्यामुळे मोडी लिपी आणि देवनागरी लिपी यांचा संगम साधून वेगळी कलाकृती दाखवण्याचा प्रयत्न केला. कधी कधी सूर ऐकताना एक चांगला स्ट्रोक येतो, तेव्हा गाण्यात हरकत घेतल्यानंतर किंवा शेर ऐकल्यानंतर जशी दाद मिळते, तशी दाद प्रेक्षकांमधून मिळते. हा सगळा प्रयोग बघत असताना पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली, असंही लोक येऊन सांगतात.

रंग आणि सूर यांच नातं नेमकं कसं साधता?
प्रत्येक रंगाला सूर असते. प्रेमाचा रंग लाल आणि क्रोधाचा रंगही लाल. मग त्यामध्ये फरक काय? एक लोभसवाणा आणि दुसरा तामसी. जेव्हा सूर तुमच्या कानावर पडतात तेव्हाच त्याचा रंगही तुम्हाला स्पष्ट होतो. म्हणजे शिवाजी महाराजांचं गाणं लागल्यानंतर केशरी रंगाची स्वैर उधळण होते. त्याचप्रमाणे शिवाजीराजांनी अनेक मोहिमा अमावास्येच्या रात्री हाती घेतल्या आहेत. त्यामुळे काळ्या रंगाचाही वापर मी करतो.

http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4747224679352405347&SectionId=28&SectionName=ताज्या%20बातम्या&NewsDate=20150320&Provider=श्रद्धा%20पेडणेकर&NewsTitle=सूर,%20ताल,%20लय,%20शब्द%20आणि%20रंगांची%20उधळण%20(साक्षात)