पूर्वीची चाळीतली दिवाळीची मजा आता अडगळीत जमा होऊ लागली आहे. सकाळी आईने न उठवता उठायचं, तेल उटण्यानं न्हाऊ माखून घ्यायचं. कार्ट्यांनी कारीट फोडलं का गं...? असा बाबांचा आवाज आला की गोविंदा म्हणत कारीट फोडायचं... त्यात बोट बुडवायचं आणि जिभेला लावताना दुसरंच बोट लावायचं. जिभेची चव न बिघडवण्याची सवय त्याच काळात लागली. छान छान कपडे घालायचे, वर्षातून एकदाच मनगटाला अत्तर लागलं की मन कसं तरतरीत व्हायचं. कंदिलाच्या शेपट्या, करंज्या इ. उरलेली कामं उरकायची.
फटाक्यांच्या पेटीवर पुन्हा एकदा लष्करी सैनिकाप्रमाणे सावध नजर फिरवायची. ऐटीत पाटावर बसायचं. आई डोळ्यांच्या आणि तूपवातीच्या निरांजनाने ओवाळायची, औक्षण करत ईडापिडा टळो म्हणत आपल्या कपाळावर बोटं मोडायची. आईच्या हातच्या भाजणीच्या चकल्या, शेव, शंकरपाळी, लाडू, चिवडा, अनारसे, करंज्या, चिवडा, चिरोटे हादडायचे हुंदडायचे आणि चाळीतल्या प्रत्येक घराबाहेर काढलेल्या रांगोळ्या निरखत हरखून जायचे.
हां हां म्हणता दिवाळी यायची आणि फटाक्यांची माळ फुटावी तशी पटकन निघून जायची.
उरायचा फक्त दिवाळीचा उदासवाणा अभ्यास आणि पुढच्या दिवाळीचा ध्यास. आता विचारावसं वाटतं....
अरे कुठे नेऊन ठेवलीत ती दिवाळी माझी.
धनानं मनावर एवढं गारुड केलंय की रुढी पार गाडून गेल्या आहेत. पूर्वी दिवाळी कलाकुसरीची होती
आता कामचुकारीची होतेय.
ज्योतीने तेजाची आरती करणारी आपली संस्कृती चायनीज पिचपिच करणा-या माळात निपचितपणे विझत चाललीय?.की आपली कला कोमात गेल्यासारखी कामातून गेलीय ?
*अस्वस्थ वाटतंय. शरीरस्वास्थही बिघडतय त्यामुळे !*
*माझा छंद माझा ढंग माझा रंग हवाय मला....*
*ही भावना आजकाल प्रत्येकाची! म्हणूनच स्वास्थ्यरंगाच्या माध्यमातून आम्ही एक अनोखं शिबीर आयोजित करीत आहोत.*
*" संस्कारभारती रांगोळी शिबिर "*
🎯 *संस्कारभारती रांगोळी -*
1. रांगोळी - इतिहास आणि परिचय
2. रांगोळी - मूळ चिन्हे, विविध आकार
3. रांगोळीचे आकार-रंग-पारंपारिक दृष्ट्या नियोजन
4. दिवाळी विशेष रांगोळी - दारा समोर रेखाटण्याकरिता सोप्या पण धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन व भाऊबीज निमित्ताच्या विशेष रांगोळी
5. रांगोळी चे प्रात्यक्षिक.
6. दिवाळी विशेष महारांगोळी
🔑 *शिबिरात महत्वाचे-*
'आरोग्यदायी दिवाळी' - दिवाळी संस्कृतीचा आरोग्यपूर्ण ऊहापोह असलेला लेख,
रांगोळी सरावास उपयोगी माहितीपत्रक आणि तालिका.
👜 *पुरविण्यात येणारी सामग्री-*
1. रांगोळी साहित्य, रंग व चाळण. 2. चहा आणि फराळ पदार्थ.
📝 *शिबीरार्थींनी आणावयाचे साहित्य -*
1. हातरुमाल / नॅपकिन
2. दुपार करिता जेवणाचा डब्बा
3. मुलींनी ओढणी आणणे आवश्यक आहे.
4. पांढरी रांगोळी घेण्याकरिता मध्यम आकाराचे प्लास्टिकचे भांडे / बाऊल.
📆 *शिबिर दिनांक - 23 ऑक्टोबर 2016, रविवार*
⏰ *वेळ - सकाळी 10 ते सायं 6 पर्यंत*
*( सकाळी 9:30 पर्यंत नोंदणी करिता येणे आवश्यक आहे.)*
🏡 *स्थळ - गुरू नानक काॅलेज, जी. टी. बी. नगर, सायन, मुंबई*
🔴 *नाव नोंदणीसाठी फोन वरुन संपर्क करणे. विना नाव नोंदणी शिबिरात प्रवेश देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.*
*रांगोळी प्रशिक्षक व मार्गदर्शक*
-
*डाॅ. तेजस लोखंडे - 9773267001*
*अधिक माहितीसाठी संपर्क -*
श्री. रोहित शिंदे - 9004717959
श्री. हर्षल रेणुके - 9867366584
कु. कोमल सोनावणे - 90049 72341
Pls like our page - https://m.facebook.com/swasthyarang
Visit our blog -
https://swasthyarang.blogspot.in/