स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

Swasthyarang Rangoli Workshop - Gudi Padwa special

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

                    ॥ स्वास्थ्यरंग ॥
                         आयोजित
   

                 🚩गुढीपाडवा विशेष🚩
              संस्कारभारती रांगोळी शिबिर

नव्या गोष्टींचा ध्यास प्रत्येक मनामनात असतो आणि एकदा का निश्चिती झाली की मग कार्यारंभाला मुहूर्त बंधनात न अडकवता लगेच त्याची मुहुर्तमेढ करता येणे शक्य  असते.. असाच आपला एक सण म्हणजे गुढीपाडवा अन् म्हणूनच ह्याची गणना साडे तीन मुहूर्तांमध्ये होते.
चैत्र पाडवा हा निसर्गाचा विसर्गकाल !  निसर्गात होणार्‍या परिवर्तनाची मुहुर्तमेढच जणू.

या दिवसापासून शुष्क झालेल्या सृष्टीत नव चैतन्य बहरु लागते अगदी वसंत बहरावा तसे. पाडवा हा आपल्या परंपरेचा भाग आहे तशीच रांगोळी देखील ह्या परंपरेचाच एक पवित्र घटक आहे. चैतन्याच्या गुढीची रेशमी रंगांची झालर मान वाढवते तर रंगबिरंगी रंगांची उधळण करत रेखाटलेली रांगोळी ही उत्सवाची शान वाढवते. रंगांची ही उधळण करण्यास स्वास्थ्यरंग परिवार पुन्हा एकदा सज्ज झालाय....
आपल्या मनीच्या ध्यासासाठी, खास पाडव्याच्या ह्या सुवर्णमय मुहुर्तावर रेखाटूया काही अविस्मरणीय क्षण, रांगोळीच्या माध्यमातून  !!

रंगोत्सवात दंग होण्यासाठी आयोजित करीत आहोत...

गुढीपाडवा विशेष संस्कारभारती रांगोळी  शिबीर

शिबिरातील घटक : (कोर्स 1 - बेसिक )

1. रांगोळी - एक नवी ओळख. (Introduction to Sanskarbharti Rangoli.)

2. संस्कारभारती रांगोळी चे मूळ आकार स्वरूप आणि त्यांचे महत्व. (Basic Shapes of Sanskarbharti  and their importance.)

3. संस्कारभारती रांगोळी मुळे शरीराला व मनाला प्राप्त होणारे फायदे. (Health through Sanskarbharti Rangoli Workshop.)

4. रंग संगती व आकार आयोजन. (Colour combinations and shape compositions.)

5. प्रात्यक्षिक. (Live demo)

6. समूह रांगोळी. (How to make rangoli a group event.)

7. गुढी पाडवा विशेष रांगोळी आणि चैत्र पाडव्याचे  आरोग्यदायी विचारमंथन व चर्चासत्र.

⏩ शिबिरात महत्वाचे -
'आरोग्यदायी पाडवा,
रंगांची उधळण स्वास्वास्थ्य जडण करणारा पाडवा' -

⏩ शिबिरात पुरविण्यात येणारी सामग्री-
1. रांगोळी साहित्य, रंग व चाळण.
2. मार्गदर्शक पत्रक
3. चहा

⏩ शिबीरार्थींनी आणावयाचे साहित्य -
1. हातरूमाल / नॅपकिन
2. दुपार करिता जेवणाचा डब्बा
3. मुलींनी ओढणी आणणे आवश्यक आहे.
4. पांढरी रांगोळी घेण्याकरिता मध्यम आकाराचा प्लास्टिक चे भांडे / बाऊल.

🔺शिबीर दिनांक - 03 एप्रिल 2016, रविवार.

🔴 नोंदणी ची अंतिम  तारीख - 1 एप्रिल 2016.

🔺वेळ - सकाळी 10 ते सायं 6 पर्यंत.

🔺नोंदणी ठीक सकाळी 9:30 वाजता सुरू होईल.

🔺स्थळ -गुरूनानक काॅलेज,  गुरूतेजबहाद्दुर (जी. टी. बी.) नगर, सायन, मुंबई

🔯 शिबीर मार्गदर्शन -
डाॅ. तेजस लोखंडे - 9773267001

☎ नोंदणी करिता व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी फोनवरून संपर्क साधावा -

श्री. हर्षल रेणुके - 9867366584
श्री. रोहित शिंदे - 9004717959
कु. कोमल सोनावणे -  9004972341

🚫 चौकशी करिता कृपया फोन करावा. व्हाॅट्स अॅप वर कोणत्याही प्रकारची माहिती दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

✅ मागील उपक्रमांचे तपशील पाहण्यासाठी फेसबुकवरील आमचे पेज लाईक करा - https://m.facebook.com/swasthyarang

Visit our blog -
https://swasthyarang.blogspot.in/