स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

Swasthyarang ॥ स्वास्थ्यरंग ॥ - स्वप्नपूर्तीची तीन वर्ष

॥ रंगबिरंगी रंगांची  ही न्यारी दुनिया,
उधळू आनंद सारी रंगांची किमया ॥

स्वप्नपूर्तीची तीन वर्ष...

चार वर्षांपूर्वीचा काळ...
त्यावेळी फक्त विचार सुचू लागले होते, लुचू लागले होते म्हणा.. चारचौघांसह विचारमंथन करायचा हक्काचा अड्डा म्हणजे नाबर सरांचं घर ! वेळ  रात्री 12 नंतरची. आमचे क्षेत्र जरी वैद्यकाचं तरी कलेचा वारसा हा दैवजात म्हटला तर वावगं ठरणार नाही. आयुर्वेदात स्वास्थ्यरक्षण महत्वाचे ! तनासोबत मनाचा विचार ही आयुर्वेदाची विशेषता. कलेतून मिळणारी प्रसन्नतेचा स्वानुभव हा बर्‍याचदा घेतला पण तोवर हे रंगशस्त्र आम्ही लोकांकरिता हाती घेतले नव्हते. पण ठाम निर्धार करून योगी वृत्तीने आमच्या नाबर गुरुजींनी खडतर व्रत आचरले आणि त्यांच्या वैचारिक मार्गदर्शनासह तेजसने त्यांच्या संप्रदायात प्रोत्साहनाने रंगकला प्रसारातून आरोग्यरक्षण करण्याचे धाडस केले. अर्जुनाचे लक्ष जसे एकाच डोळ्यावर होते त्याच एकाग्रतेने रांगोळीतून रंग उधळून अनेक स्वास्थ्य सोहळे पार पाडले.

            रांगोळीने या स्वास्थ्यरंग चे पहिले पाऊल पडले शनिवार दहा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी. विनायक ची साथ, नंदीनी ताईंच्या प्रोत्साहनाने ती पहिली स्वास्थ्य चळवळ सुरू झाली. चैतन्याने आमची इच्छाशक्ती प्रबळ केली.

त्यानंतर आराध्य दैवत चिंतामणी आगमन सोहळा, नवरात्रौत्सवातील देवीच्या विविध रूपांची रांगोळी, पाडव्याच्या शोभायात्रेत ढोलताश्यांच्या तालावरची जुगलबंदीतली रांगोळी, जर्मन विद्यार्थ्यासाठीच्या कोर्स च्या वेळी काढलेली रांगोळी, सायन काॅलेज च्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्याची तसेच माझ्या के.सी.काॅलेज च्या सुवर्ण महोत्सवी वर्षांची रांगोळी, विविध कार्यक्रमातील स्वास्थ्य आणि रंग या विषयावर आयोजित करण्यात आलेले व्याख्यान,  धन्वंतरी याग-शिवमंथन अशा कार्यक्रमातील मानाची ठरलेली रांगोळी, अनेक ठिकाणी साकारलेली महारांगोळी,  जन्मस्थान असलेल्या मित्तल रूग्णालयातील सत्यनारायणाच्या पूजेतील रांगोळी आणि असे कित्येक आनंदी क्षण रंगांची उधळण करत गेले.
आता आठवणी साठल्या.. मनात दाटल्या... त्याच आज परिवारात वाटल्या.

            कलेतील जुगलबंदी करताना रांगोळी साकारतानाचे क्षण हे एका छायाचित्रकाराच्या नजरेतून पाहण्याकरिता पु. ल. देशपांडे अकादमी च्या दालनात विनय चे छायाचित्र प्रदर्शन आज ही आठवते.
श्याम चे कथ्थक नृत्यातून गणेशास आवाहन आणि तेजस च्या रांगोळीतून तेच गणेशावतरण होतानाचा कलाविष्कार. सगळंच भन्नाट ...
काय नाही दिलं स्वास्थ्यरंगाने ? स्पर्धक ते परिक्षक असा राज्यस्तरीय मान हा ही स्वास्थ्यरंग मुळेच. आतापर्यंत चे घेतलेले रांगोळी प्रशिक्षण शिबीर असो वा एखादा लाईव्ह परफॉर्मन्स.. तो निर्विघ्न पार पडण्यासाठी कलाधिपती चा आशीर्वादाचा हात आणि परिवारातील मित्र मैत्रिणींची लाभलेली साथ, हेच स्वास्थ्यरंगाचे धन.

धवल, हरेश, अक्षय, जितेन, अभिजीत, गायत्री यांनी  मजबूत पाय रोवणी करून पुढील सूत्रे रोहित, बाळा, संध्या, स्वप्नील अशा नवोदित मंडळाकडे सुपूर्त केली.
आनंदाच्या डोहातली ही मंडळी संस्कृतीच्या पाऊलखुणा जपत.. आपलं तन-मन एक करून स्वास्थ्यसेवेत रमलीत.
रंग, रांगोळी, नृत्य, चित्रकारी,
शब्द, नाद, अक्षर, अदाकारी अशी
घटकाभरची करमणूक वा दोन घडींचा विरंगुळा घडवावा याकरिता एकत्र  भेटण्याची आवश्यकता असते. निसर्गाच्या कुशीत दुःखाचा विसर्ग आपोआपच होतो म्हणून निसर्गाच्या सानिध्यात भेट घडावी, सोबत आपल्या ऐतिहासिक वास्तूंची ओळख व्हावी म्हणून स्वास्थ्यरंग चे दुसरे अंग - "गडभेट - निसर्गाशी जुळले नाते थेट" चे आयोजन केले. वय वर्षे आठ ते साठच्या लोकांनी गडभेटीतून आमचा सोहळ्याला पसंती दिली. आयोजनात रोहित, महेंद्र, मोहन, दाभोळकर सर आणि प्रसंगावधान राखणारे संजय भाऊ, कल्पना आणि वृषाली वहिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बघता बघता स्वास्थ्यरंग परिवाराने आमचं सगळं देहभान व्यापून टाकलं. आयुष्याच्या क्षणाक्षणांशी  बांधलेल्या स्वास्थ्यगाठी
आठवणींना आता अशा बिलगल्या आहेत की ती गळामिठी सोडवत नाही.

आम्ही घेतलेला हा नवा ध्यास.. नवा श्वास, आणि कलेची आस !
कौतुकाने पाठीवर थाप मारलीत तर भरुन पावू.
पंखातलं बळ आता भरारी घेऊ पाहात आहे.
सात समुद्रापार स्वास्थ्याची रंगध्वजा आम्ही नेऊ,
उच्च प्रतीचे कलागुणांचे नजराणे आम्ही पेश करू.
रसिकजनांचे जीवन सारे आनंदावर स्वार करु.
भव्य दिव्य दृकश्राव्य कलांचे चीज करु.

ज्यांनी ह्या प्रवासात आमच्या परिवाराला आपलं मानून पसंती दिली, अशा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे आम्ही शतशः आभारी आहोत.
स्वास्थ्यरंग वर आतापर्यंत प्रेम केलंत तसंच अनंतकाळ कराल अशी खात्री बाळगतो.

आपलेच,
॥ स्वास्थ्यरंग ॥

Page link - https://m.facebook.com/swasthyarang

Blog link - https://swasthyarang.blogspot.in